HW News Marathi
महाराष्ट्र

तू लहान आहेस. तोंड बंद करण्याचा उपाय आमच्याकडे आहे, नारायण राणेंचा सरदेसाईंना सल्ला

मुंबई | सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटवरून त्यांना अनेक स्तरांतून टीका करण्यात आल्या. “युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांवर टीका केली.त्यांनी ज्या शब्दात टीका केली त्यावर मी त्यांना एवढंच सांगेल की, तू लहान आहेस. तोंड बंद करण्याचा उपाय आमच्याकडे आहे. त्यामुळे तोंड सांभाळून बोल”, असा इशारा भाजप नेते नारायण राणे यांनी दिला. नारायण राणे यांनी आज (४ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे.
“शिवसेनेचा अन्याय पाहून सगळे गेलेत. शिवसेनेत आता नवे केलेक्टर ऑफिसर आले आहेत. त्यांच्या कुंडल्या आम्हाला माहिती आहेत. ते कुठे जातात, काय करतात, कुणाशी बोलतात, कुणाशी तडजोड करतात, ते सर्व आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी तोंड बंद करावं. वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीसांवर ज्या शब्दात टीका केली, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी”, असे नारायण राणे यांनी आवाहन केले.
काय केले होते अमृता फडणवीस यांनी ट्विट?
“बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे – मला वाटते मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी जगणे यापुढे सुरक्षित वाटत नाही” अशा आशयाचे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार, ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी

News Desk

परमबीर सिंहांच्या दोन पोलीस निरीक्षकांना CID कडून अटक

Gauri Tilekar

“दिल्लीत आमचेही दिवस येतील”, संजय राऊतांचा इशारा

News Desk