HW News Marathi
महाराष्ट्र

नाणार जमीन अधिग्रहण अधिसूचना रद्द | सुभाष देसाई

रत्नागिरी | नाणार येथे होणा-या रिफायनरी प्रकल्पावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. असे असताना नाणारमध्ये हा प्रकल्प होऊ देणार नाही. अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केली असताना दुसरीकडे उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी नाणार रिफायनरी जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द झाल्याची घोषणा केली.

रत्नागिरीच्या दौ-यावर असलेले उद्धव ठाकरे नाणार प्रकल्पाबाबत नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नाणारमध्ये होत असलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. भाजपप्रणीत सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने, प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पासंदर्भात उद्योग विभागाने काढलेला अध्यादेश रद्द करून, शिवसेनेने आपली भूमिका कृतीतूनही स्पष्ट करावी अशी अपेक्षा नाणारवासियांची होती.

उद्धव ठाकरे परदेशात असताना केंद्र सरकारने शिवसेनेला अंधारात ठेऊन, सौदी अरेबियातल्या कंपनीबरोबर या प्रकल्पासाठी कराराला मंजुरी दिली. त्यामुळे चिडलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती. त्याआधी हा प्रकल्प बळजबरीने राबवण्याचा प्रयत्न झाल्यास आपण मंत्रीपद सोडू अशी भूमिका शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनात घेतली होती.

 

 

 

 

 

Related posts

भाजपचा दणका, आयुक्तांकडून स्थायी समितीतील ६५० कोटींचा फेरफार रद्द

Aprna

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध! – दिलीप वळसे -पाटील

Aprna

ठरलं! शिक्षक आणि विद्यार्थ्यांना यावर्षी दिवाळीची सुट्टी केवळ ५ दिवस

News Desk