HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करत शरद पवारांच्या तब्येतीची केली विचारपूस

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना काल(२९ मार्च) पोटदुखी आणि पित्ताशयाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. अनेकांनी ट्विटरवरुन शरद पवार यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली.

यामध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल आपल्या तब्येतीची विचारपूस केल्याचे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

कालपर्यंत महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांना शरद पवार यांची अचानक इतकी काळजी का वाटू लागली, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. शरद पवार यांना राजकारणातील सर्वपक्षीय नेते मानत असले तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता भाजप आणि राष्ट्रवादीतील जवळकीची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

शरद पवार आणि अमित शहा यांची भेट?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या अहमदाबादमधील कथित भेटीनंतर आता महाराष्ट्रातील राजकारणाचा पट नव्याने मांडला जाणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने ही भेट झाली नसल्याचे एकीकडे म्हटले असताना दूसरीकडे मात्र अमित शहा यांनी सगळ्या गोष्टी सार्वजनिक नसतात असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे नेमकं काय खरं प्रेम आहे हे अजुन तरी गुलदस्त्यात आहे. दरम्यान, शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी भाजपच्या नेत्यांनी देखील केली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही शरद पवार यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला

News Desk

केवळ लष्करालाच नव्हे तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करु !

News Desk

कुलभूषण जाधव प्रकरणात आयसीजेत आज निकाल

News Desk