HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मोदी सर्वात लोकप्रिय नेते!

नववी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांनी जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत ही लोकप्रियता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. अमेरिकतील ग्लोबल लीडर अॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात मोदींना ७० टक्के गुणांकन मिळालंय. दर आठवड्याला या सर्वेक्षणाचा डेटा अपडेट केला जातो.

पंतप्रधान मोदी मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटालियन पंतप्रधान मारियो ड्रॅगी, जर्मन चान्सलर अँजेला मर्केल, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या पुढे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता प्रौढांमध्ये सर्वात कमी असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलंय. भारतात सर्वेक्षण केलेल्या प्रौढांपैकी २५ टक्के लोकांनी मोदींना नाकारलं आहे.

मॉर्निंग कन्सल्टच्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान मोदी गेल्या आठवड्यात सर्वेक्षण केलेल्या तेरा जागतिक नेत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर होते. यावर्षीच्या जून महिन्यात त्यांचे गुणांकन ६६ टक्क्यांवर घसरले होते. दरम्यान, ऑगस्ट २०१९ मध्ये मोदींचे गुणांकन तब्बल ८२ टक्क्यांवर होते. पण गेल्या दोन वर्षात त्यात घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

सर्वेक्षण कसं झालं?

मॉर्निंग कन्सल्टच्या मालकीची पॉलिटिकल इंटेलिजन्स ही निवडणुका, निवडून आलेले उमेदवार आणि मतदानाच्या समस्यांवर रिअल-टाइम पोलिंग डेटा प्रदान करते. मॉर्निंग कन्सल्ट जागतिक स्तरावर ११ हजारहून अधिक मुलाखती घेते आणि अमेरिकेतील ५ हजार नोंदणीकृत मतदारांच्या अध्यक्षीय निवडणुकांबद्दल मुलाखती घेते. तर, भारतात सर्वेक्षणात सहभागी केल्या जाण्याऱ्या लोकांच्या ऑनलाइन मुलाखती घेतल्या जातात. प्रत्येक देशात वय, लिंग, प्रदेश, शिक्षण आणि काही विशिष्ट देशांमध्ये अधिकृत सरकारी स्त्रोतांवर आधारित सर्वेक्षण केले जाते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील इंधन दरवाढ कायम, सामान्यांमध्ये संताप

Gauri Tilekar

केंद्रीय कॅबिनेटने मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून आता २१ वर्ष करण्याच्या विधेयकाला दिली मंजुरी

News Desk

“भारत जोडो यात्रेमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करा…”, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र

Aprna