HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकारमधील 4 मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी राजीनामा

नवी दिल्ली | विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल (६ जुलै) समाप्त झालं. या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. आज (७ जुलै) मोदी कॅबिनेट विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मोदींनी मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात केली असून केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राजीनामा दिला आहे. कोरोनानंतर त्यांची प्रकृती ठीक नसल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

मंत्र्यांकडून राजीनामे येण्यास सुरुवात

मोदी-कॅबिनेट विस्ताराला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज सांयकाळी होणार आहे. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असेल. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगारमंत्री संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांनी राजीनामा दिला आहे.

नवीन मंत्री मंडळामध्ये कोणाचा समावेश असेल

रिटा बहुगुणा जाेशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जाेशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डाॅ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात आले आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद साेनाेवाल यांच्यासह सुशील माेदी, वरुण गांधी, भूपेंद्र यादव, दिलीप घाेष या भाजप नेत्यांना तसेच लल्लन सिंग (जेडीयू), पशुपती पारस (एलजेपी), अनुप्रिया पटेल (अपना दल), चंद्र प्रकाश (एजेएसयू) यांना सामावून घेण्याचा भाजप पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न राहणार आहे. दरम्यान, नारायण राणे, प्रीतम मुंडे, कपिल पाटील दिल्लीत पोहचले आहेत. डाॅ, भागवत कराड दिल्लीमध्ये आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अल्पसंख्याकांनाही सामावून घेण्यात येऊ शकते.

कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत हे नवीन राज्यपाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधीच विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत यांना मंत्रिपदावरून हटवून कर्नाटक राज्याचे राज्यपाल बनविण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांनी बिगर भाजप शासित राज्यांना पेट्रोल-डिझेलवरील किंमतींवरुन खडेबोल सुनावले

Aprna

अखेर विजय मल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

News Desk

दिल्ली विधानसभेचे बिगुल वाजले, आजपासून आचारसंहिता लागू

News Desk