नवी दिल्ली | देशात कोरोना लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू होणार असून, जगातील या सर्वात मोठय़ा कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोनाविरोधी आघाडीवरील ३ कोटी कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज(११ जानेवारी) दुपारी ४ वाजता पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर ऑनलाईन बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्यांमधील कोरोनाची परिस्थिती व लसीकरण अभियानाची किती तयारी झालेली आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे.
आढावा घेतल्यानंतर, लोहरी, मकर संक्रांत, पोंगल, माघ बिहू इत्यादी सणांच्या पाश्र्वभूमीवर लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला’, असे केंद्र सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. तर लसीकरणाचा हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
PM Narendra Modi to interact with Chief Ministers of all states via video conferencing today. They will discuss the #COVID19 situation and vaccination rollout. (File photo) pic.twitter.com/VOtjC9uKhw
— ANI (@ANI) January 11, 2021
कोरोना लसीकरण १६ जानेवारीपासून
‘सीरम इन्स्टिटय़ूट’ने तयार केलेली ऑक्सफर्डची ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लशींना भारताने अलीकडेच आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. या दोन्ही लशी सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.