HW News Marathi
महाराष्ट्र

“ही तर शरद पवारांची कॉंग्रेसला धमकी…”,नारायण राणेंचं खोचक वक्तव्य

मुंबई | महाविकास आघाडी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अधिक जोमानं एकसोबत निवडणूक लढणार अशी घोषणाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी केली होती. यावेळी पवार यांनी शिवसेनेचं तोंडभरुन कौतुकही केलं होतं. तसंच ठाकरे आणि मोदी भेटीवर बोलताना त्यावर किंचितही विचार करण्याची गरज नसल्याचं पवार म्हणाले होते. त्यावर आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी मोठा दावा केला आहे. शरद पवार बोलले असले तरी ते शिवसेनेबरोबर निवडणूक लढणार नाहीत. त्यांनी एकप्रकारे काँग्रेसला धमकी दिल्याचं ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे.

काय आहे नारायण राणे यांचं ट्विट?

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणालेले आहेत. जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो”, असं ट्वीट करत नारायण राणे यांनी पवारांच्या वक्तव्यावर भाष्य केलंय. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसला एकप्रकारे सावधगिरीचा इशाराही दिला आहे.

पवार कधीही सेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत!

दरम्यान, आपल्या ट्वीटमध्ये नारायण राणे यांनी शरद पवारांच्या विधानाचा संदर्भ घेऊन भाकित देखील केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार असं म्हणाले आहेत. जरी शरद पवार असं म्हणाले असले, तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार नाहीत”, असं भाकित राणेंनी या ट्वीटमध्ये केलं आहे.

दरम्यान, याआधी शरद पवार यांनी शिवसेनेबाबत घेतलेल्या भूमिकेवरून भाजपा आमदार राम कदम यांनी देखील टीका केली होती. “शरद पवार यांना शिवसेना हा वचन पळणारा मित्र आहे, असे म्हणावे लागले ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची राजकीय हतबलता आहे. तसेच ही शरद पवारांची राजकीय अडचण आहे. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे वचन पाळू शकला नाही तो वचन पाळणारा पक्ष कोणत्या आधारावर आहे”, असं राम कदम म्हणाले आहेत. विशेष म्हणजे, नारायण राणे यांनी ही शरद पवारांची खेळी असल्याच्या आशयाने टीका केली असताना, त्यांच्याच पक्षाचे राम कदम यांनी मात्र शिवसेनेचं कौतुक करणं ही शरद पवारांची हतबलता असल्याची टीका केली आहे.

आघाडी सरकारचं काम उत्तम

हे आघाडीचं सरकार चांगलं काम करत आहे. कोणी काही म्हणो, इथं आपण वेगळ्या विचारांचं सरकार स्थापन केलं. कधी वाटलं नव्हतं सेनेबरोबर आपण सरकार बनवू. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार पाच वर्ष टिकेल. एव्हढंच‌ नाही तर लोकसभा, विधानसभेला चांगली कामगिरी करेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

मविआ सरकार ५ वर्ष टिकणारसहकाऱ्यांच्या कष्टानं राष्ट्रवादीने २२ वर्ष पूर्ण केले. राजकारणात सतत काम करत राहाणे गरजेचं आहे. सत्ता ही महत्त्वाची आहेच, लोकांचे प्रश्न सोडावण्यासाठी सत्ता गरजेची आहे. मविआ सरकार ५ वर्ष टिकणार, नुसतं टिकणार नाही तर लोकांसाठी कामही करणार, असं शरद पवारांनी सांगितलं.देशात अनेक पक्ष बनले, काही टिकले तर काही कधी गायब झाले कळलं नाही. राष्ट्रवादी योग्य दिशेने जात आहे. पक्षातून काही लोक गेले तर नवीन लोक तयार झाले. तीन पक्षाच्या सरकारला लोकांनी स्वीकारलं, लोकांच्या याच विश्वासावर हे सरकार उत्तम सुरु आहे. सत्ता एकाच ठिकाणी राहू नये, एकाच ठिकाणी राहिल्याने सत्ता भ्रष्ट होईल, असं पवार म्हणाले आहेत.

प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बसले आणि चर्चा केली असं सांगत लगेच वेगवेगळ्या शंका घेण्यात आल्या असं सांगत शरद पवारांनी यावेळी टीकाकारांना उत्तर दिलं. “शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचं राज्य आलं त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना”.

“नुसते पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने ज्या पद्दतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसं होणार नाही,” असं शरद पवार म्हणाले आहेत.

“देशात अनेकांनी अनेक पक्ष काढले. १९७७ मध्ये जनता पार्टीचा प्रयोग झाला पण दोन वर्षात तो प्रयोग संपला. असे अनेक पक्ष आले.. पण राष्ट्रवादीनं २२ वर्ष पूर्ण केली. सहकाऱ्यांच्या कष्टानं, जनतेच्या बांधिलकीमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहेत. जनतेचा विश्वास संपादन करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. कधी आपण सत्तेत होतो तर कधी नव्हतो, पण त्याचा त्याचा फारसा काही परिणाम होत नाही,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पंकजा मुंडेंनी मला मेळाव्याला बोलावलं नाही तर…”- महादेव जानकर

News Desk

मोठी बातमी ! नष्ट केलेला डीव्हीआर, सीपीयू एनआयएला सापडला, तपासावेळी सचिन वाझेही उपस्थित

News Desk

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अविनाश भोसले यांना 10 दिवसांची CBI कोठडी

Aprna