मुंबई | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी संबंध असलेल्या व्यक्तींवर राष्ट्रीय तपास संस्थेने मोठी कारवाई केली आहे. एनआयएने आज (९ मे) मुंबईतील नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आणि इतर ठिकाणी एकूण तब्बल २९ ठिकाणींनी छापेमारी केली आहे. एनआयएने दाऊदशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या मालमत्तेवर छापेमारी केली आहे. यात दाऊदचा संबंधित हवाला ऑपरेटर आणि ड्रग्ज पेडलर यांच्यावर एनआयएने कारवाई केली आहे.
दरम्यान, माहिम दर्ग्याचे ट्रस्टी सोहेल खंडवणी यांच्या घरावरही एनआयने छापेमारी केली आहे. तर खंडवली नवाब मलिकांची व्यवसायिक भागीदारी असल्याची माहिती मिळाली आहे. माहिम येथील बाबा फालुदाचे मालक अस्लम सरोटीया यांच्या घरी छापेमारी केली आहे. ग्रँट रोड भागातून सलीम फ्रूट नावाची व्यक्तीला एनआयएने ताब्यात घेतले आहे. तसेच १९९३ च्या बॉम्बब्लास्टरशी संबंधित एका आरोपीच्या घरी देखील एनआयने छापेमारी केली आहे.
दरम्यान, दाऊद हा पाकिस्तानमधून अंडवर्ल्डचे नेटवर्क चालवित आहे. १९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोटातील दाऊत हा मुख्य आरोप असून यात १३ साखळी बॉम्बस्फोट झाल्याने मुंबई हादरली होती. यात २५७ जणांचा मृत्यू झाला तर ७५० लोक जखमी झाले. २००३ यूएनने दाऊदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. दाऊदवर २५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले. दाऊदच्या संबंधित प्रकरणाचा तपास हा २०२२ मध्ये एनआयएकडे सोपवण्यात आले आहे.
National Investigation Agency (NIA) conducts raids at more than one dozen locations in Mumbai against Pakistan-based gangster Dawood Ibrahim’s associates and a few hawala operators pic.twitter.com/mAUq4w8gul
— ANI (@ANI) May 9, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.