HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावली

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने दिनांक मंगळवारी (११ डिसेंबर) रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात भयानक दुष्काळाने डोके वर काढले असून या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे सरसावले आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दुपारी २ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने मदतीचा हात दिला जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीच्या मासिकाच्या डिसेंबर अंकाचा प्रकाशन सोहळा आणि १०० टक्के बूथ कमिटी स्थापन करणार्‍या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा गौरव व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील,ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी  महाराष्ट्रात होणार पहिली गुंतवणूक

Aprna

सोनिया म्हणजे नवमातोश्री, शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि राऊत म्हणजे नॉटी बॉय

News Desk

आम्ही काही मेलेल्या आईच दूध प्यायलो आहोत का? राऊतांच्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक 

News Desk