मुंबई | रविवारी मुंबईत ३ ठिकाणी दरड कोसळून काही लोकांचा मृत्यू झाला आहे. २ दिवसांच्या पावसाने मुंबईत पाणी साचलं होतं आणि वाहतूक सुद्धा विस्खळीत पडताना दिसली. दरड कोसळल्याच्या अनेक घटना घडल्या असून 24 तासांत जवळपास 37 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यावरुन, भाजपा नेते आक्रम झाले असतानाच आता खासदार नवनीत कौर यांनीही बीएमसीच्या कारभारावरुन शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
नवनीत कौर यांचं भाष्य
विरोधी पक्ष हे नेहमीच एकमेकां विरोधात बोलत असतात. पावसामुळे मुंबईची तुंबई होते याचं खापर कौर यांनी ठाकरे सरकारवर फोडलं आहे. सलग ३ पिढ्या महापालिकेत असफल झाल्याचा थेट आरोप नवनीत कौर यांनी केला आहे. रौद्र रूप धारण केलेल्या पावसात शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत संरक्षक भिंत कोसळून, दरड पडून तसेच घरांची पडझड अशा पाच दुर्घटनांमध्ये २८ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला, त्यांनंतर आज पुन्हा दरड कोसळल्याच्या घटनांमध्ये काहीजण मृत्यूमुखी पडले आहेत. मुंबईतील या विदारक पूरस्थितीवर खासदार नवनीत कौर यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई तुंबली,मुंबई महानगर पालिका बुडाली पाण्यात ,ठाकरेंची तिसरी पिढी असफल,मनपा चे पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा,,माझी मुबंई माझी जबाबदारी म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे सर्व मुंबईकरांना नाहक त्रास pic.twitter.com/SfKOvsyqgO
— Navneet Ravi Rana (@navneetravirana) July 19, 2021
३ पिढ्या महानगपालिकेत अयशस्वी
महानगरपालिके मध्ये शिवसेनेची सत्ता आहे हे जरी खरं असलं तरी, बीएमसीमध्ये गेल्या 3 पिढ्यांपासून ठाकरेंच राज्य अयशस्वी ठरलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेला फंड एकीकडे आणि बीएमसीला मिळणारा फंड एकीकडे आहे. दरवर्षी मुंबईत दोन दिवसांच्या पावसानंतर रस्ते बंद होतात, रेल्वे ट्रॅक बंद होतात, दुर्घटना घडतात, वातावरण थांबून जाते, असे म्हणत खासदार कौर यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी बीएमसीचे लोकं कोट्यवधी रुपये नालेसफाई आणि ड्रेनेज सफाईसाठी खर्च करतात. बीएमसीच्या खर्चाबाबत थर्डपार्टी ऑडिट करणं गरजेचं आहे. त्यासाठी, केंदाने संसदीय समिती नेमण्याची गरज आहे. त्यावेळीच, बीएमसीकडून किती रुपये खर्च केला जातो, हे जनतेसमोर येईल. त्यामुळे, मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय समितीकडे याबाबत मागणी करत असल्याचं नवीनीत कौर यांनी म्हटलं आहे. नवनीत कौर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, संसदीय समितीकडे मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.