HW News Marathi
महाराष्ट्र

भारतीय नौदलातील साताऱ्याच्या सुपुत्राचं धाडसी कर्तुत्व, 186 मच्छिमारांना वाचवलं, नौदल प्रमुखांनी घेतली दखल

सातारा | तौक्ते चक्रीवादळात सातारच्या सुपुत्राने महत्वपूर्ण कामगिरी केली. पाटण तालुक्यातील सणबुरच्या या सुपुत्राचं नाव शिवम जाधव असं आहे. ते भारतीय नौदलात लेफ्टनंट पायलट पदावर आहेत. त्यांनी नौदलातील आपल्या सहकाऱ्यांसोबत तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या 186 मच्छिमारांचे प्राण वाचवले आहे. यामुळे सातारा जिल्ह्याच्या शौर्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच, शिवमसह त्याच्या आई वडीलांचंही कौतुक केलं आहे.

तौक्ते चक्रीवादळात सापडलेल्या 186 मच्छिमारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात लेफ्टनंट पायलट शिवम विठ्ठल जाधव आणि त्यांच्या नौदलातील सहकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका होती. म्हणूनच याची दखल नौदल प्रमुखांपासून संरक्षण मंत्र्यांपर्यंत सर्वांनी घेतली आहे.

तौक्ते वादळ मुंबई येथे धडकताच ताशी 120 ते 140 वेगाने वारे वाहत होते. वादळामुळे समुद्रातील जहाजे व मच्छिमारांच्या नौका उलटल्या होत्या. चक्रीवादळामुळे मुंबई येथील अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक मच्छीमार भयानक वादळात अडकून पडले. काही जहाजावरील कर्मचारी भरकटल्याची खबर मुंबई येथील भारतीय नौदल अधिकार्‍यांना मिळाली. याच वेळी नौदलाचे लेफ्टनंट पायलट शिवम जाधव यांनी आपल्या नौदलातील सहकाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.

यावेळी वादळात अडकलेल्या 186 मच्छिमारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात त्यांना यश आलं. या कामात जहाजावरील पायलट शिवम जाधव यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या कामगिरीचे नौदल प्रमुखांनी व संरक्षणमंत्री यांनी कौतुक केले. या कामगिरीची ग्रामस्थांना माहिती मिळताच शिवम जाधव यांच्यासोबत त्यांचे वडील विठ्ठल जाधव आणि आई संगिता जाधव यांचंही कौतुक करण्यात आलंं आहे.

“आम्हाला शिवमचा अभिमान, अशीच देशसेवा करत राहो”

शिवमने सातारा सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यापासूनच एनडीए करण्याचे स्वप्न बाळगले. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द व चिकाटीने यश प्राप्त केले. नौदलात लेफ्टनंट पायलट पदावर काम करताना त्याने धाडस दाखवत जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचविले. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. देशसेवा करताना अशीच चांगली कामगिरी त्याने करावी ही सदिच्छा,” अशी प्रतिक्रिया शिवमचे वडील विठ्ठल जाधव आणि आई संगिता जाधव यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शबाना आझमी यांच्या कारचा खालापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात

swarit

आम्ही त्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही, नाना पटोलेंचा चंद्रकांतदादांना खोचक टोला

News Desk

जयंत पाटलांचा सासरवाडीत पराभव, भाजपचा एकतर्फी विजय

News Desk