HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारने बोकडाच्या कुर्बानीवर कोणतीही बंदी घातलेली नाही – नवाब मलिक

मुंबई | कोरोनामुळे गेले २-४ महिने सर्व सण हे अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी साजरे होताना दिसत आहे. अशातच बकरी ईद देखील साधेपणाने साजरी करावी असे आवाहन सरकारने केले होते. दरम्यान, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनंतर बोकडाच्या कुर्बानीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

राज्य सरकारने कुर्बानीवर कोणतीही बंदी घातलेली नाही. तसेच बोकडाच्या वाहतुकीवरही कोणतीही बंदी असणार नाही, असे नवाब मलिक म्हणाले आहेत..“बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. जे काही गैरसमज आहेत ते गृहमंत्री संबधीत अधिकाऱ्यांशी बोलून दूर करतील. मुंबई शहरात बकरी आणण्यासाठी कोणतीही वाहतुकीची अडचण नाही. बोकडाच्या वाहतुकीवरही कोणतीही बंदी असणार नाही. ज्यांनी बकरी ऑनलाईन बुक केली असेल. त्यांनाही बकरी मिळेल,” असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याणमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारा; राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

मुंबई पोलिसांकडून चॅनलचा खोटा TRP वाढवणारे रॅकेट उध्वस्त, रिपब्लिक टीव्हीचा यात समावेश

News Desk

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा आज घेणार राज्यपालांची भेट

News Desk