HW News Marathi
क्राइम

जावयावर एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईसंबंधी नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

मुंबई | ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या आर्यन खान वादात नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेउन नवे गौप्यस्फोट केले आणि त्यानंतर अनेक प्रकरणं समोर यायला सुरुवात झाली. देशातील एनसीबी ही एवढी मोठी तपास संस्था आहे, त्यांच्याकडे अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरात आहे. तरीही तंबाखू आणि गांजा यातील फरक त्यांना करता आला नसल्याचा आरोप राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. लोकांना बदनाम करण्याचे काम एनसीबीकडून सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.

समीर खान हे ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पसरवली जात होती

“आपले जावई, समीर खान यांना 12 जानेवारीला रात्री 10 वाजता ईडीचे समन्स आले आणि त्यांना ईडीच्या कार्यालयात 13 तारखेला सकाळी 10 वाजता बोलवण्यात आले. माध्यमांना याची माहिती देखील आधीच देण्यात आली होती. त्याच नंबरवरुन तसा मेसेज करण्यात आला होता. त्यामध्ये समीर खान हे ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पसरवली जात होती. या बनावट प्रकरणात आपल्या जावयाला अटक करण्यात आले”. असं नवाब मलिक म्हणालेत. पुढे ते असं देखील म्हणाले की, 8 जानेवारी रोजी एका व्हॉट्सअॅपवरुन मुंबईतील काही माध्यमांना एक मेसेज करण्यात आला होता. त्यामध्ये आधीच आपण एक रेड करुन ड्रग्ज संदर्भात कारवाई करत असल्याचे सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे समीर वानखेडे यांचे नाव या माहितीच्या खाली होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. कानपूरला छापा मारण्यात आला आणि त्याची माहिती एनसीबीच्या माध्यमातून देण्यात आली.

तंबाखू आणि गांजामध्ये एनसीबीला फरक करता आला नाही. 200 किलो गांजा आपल्या जावयाकडे नव्हताच, ते हर्बल तंबाखू असल्याचे स्पष्ट झाले असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसात सातत्याने नवाब मलिकांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून त्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यांना फोनवरुन या प्रकरणी जीवे मारण्याची धमकी मिळाली असून त्यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोहराबुद्दीन शेख फेक एन्काउंटर | वंझारांच्या सुटकेची याचिका न्यायालयाने फेटाळली

swarit

मुदखेडमध्ये पकडली गांजाची झाडे

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती

Aprna