HW News Marathi
महाराष्ट्र

परमबीर सिंग हे दिल्लीत कुणाकुणाला भेटले याची माहिती आमच्याकडे; योग्यवेळी सत्य बाहेर येईल…

मुंबई | गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर आणि गृहमंत्र्यांवर अधिकार्‍यांनी सवाल उपस्थित केले होते त्यावेळी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी राजीनामा दिला होता का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.भाजपचे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली असून या टिकेला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

रवीशंकर प्रसाद यांनी लोकांना शिकवू नये.भाजप हायमॉयरिटीची वार्ता करते मात्र त्यांचे कोणी संघटनात्मक पदावर नाहीत. मात्र संघाच्या कार्यालयात जाऊन सरकारची रिपोर्टींग करतात ही कोणती मॉरीलिटी… ही कोणती संघटनात्मक प्रोसेस आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान परमवीरसिंग यांचे पत्र ही ठरवून केलेल्या एका कटाचा हिस्सा आहे. परमवीरसिंग दिल्लीत कुणाकुणाला भेटले याची माहिती आमच्याकडे आहे त्यामुळे चौकशीतून याची सत्यता समोर येईल असेही नवाब मलिक म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनानंतर आता राज्यात नवा धोका? वटवाघूळांमध्ये आढळला निपाह व्हायरस

News Desk

थांबा.. अभ्यास सुरू आहे, पूर्ण होताच कॉंग्रेस सोडू -राणे

News Desk

रश्मी शुक्लांना अटकेपासून दिलासा मात्र अनिल देशमुखांवर टांगती तलवार

News Desk