गडचिरोली | जांभुरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी काल (१ मे) भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर आज (२ मे) बॅनर लावून सरकारला धमकी दिली आहे. पूल आणि रस्ते बांधू नका, असे बॅनर उत्तर गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांकडून लाविण्यात आले आहेत. उत्तर गडचिरोली विभागीय कमिटीद्वारे अशाप्रकारचे बॅनर अनेक गावांमध्ये लावण्यात आले आहेत.
Maharashtra: Naxal banners spotted near the site of Gadchiroli naxal attack, in which 15 security personnel and 1 driver lost their lives yesterday. pic.twitter.com/eqcHIFZRs9
— ANI (@ANI) May 2, 2019
या परिसरात लावण्यात आलेल्या बॅनर्सद्वारे एप्रिल२०१८ मध्ये कसनसूर येथे झालेल्या ४० नक्षलींच्या एन्काऊंटरचा निषेध नोंदविण्यात आला आहे. २७ एप्रिल २०१९ रोजी डिव्हीसी कॉम्रेड रामको नरोटी हिचा देखील पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. या घटनेचा सुद्धा निषेध करण्यात आला आहे. याचबरोबर आज राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.
Union Minister of State for Home Hansraj Ahir to visit the site of #Gadchiroli Naxal attack, today. pic.twitter.com/Ok3lV8aKXC
— ANI (@ANI) May 2, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.