HW News Marathi
क्राइम

मंत्री नवाब मलिक यांचा कारवाईचा आरोप एनसीबीने फेटाळला

मुंबई | ‘मुंबईत एनसीबीने क्रूझवर कारवाई करून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काहींना अटक केलेली आहे. मात्र आर्यन खानला अटक करताना ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे, तो के. पी. गोसावी नावाचा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याची बाब खुद्द एनसीबीने सांगितली आहे. तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनीष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून तोही एनसीबीचा अधिकारी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मग या दोघांनी कोणत्या अधिकारात हायप्रोफाइल लोकांना अटक केली, याचे उत्तर एनसीबीने दिले पाहिजे’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी केली होती.

मलिक यांनी ज्या दोन व्यक्तींची नावे घेतली होती ते दोघेही या कारवाईत साक्षीदार

क्रूझवर छापा टाकून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या कारवाईवर मंत्री नवाब मलिक यांनी संशय घेतला असतानाच एनसीबी अधिकाऱ्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत मलिक यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. एनसीबीने कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच ही कारवाई केली आहे. क्रूझवरील पार्टीतून ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे, असे या अधिकाऱ्यांनी नमूद केले. मलिक यांनी ज्या दोन व्यक्तींची नावे घेतली होती ते दोघेही या कारवाईत साक्षीदार असल्याचे नमूद करताना त्यात काहीही गैर नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

क्रूझवर ड्रग्ज सापडलं तर मग फोटो एनसीबी कार्यालयात का काढले, असा सवालही मलिक यांनी विचारला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असताना एनसीबीने तातडीने पत्रकार परिषद घेऊन कारवाईबाबत स्पष्टीकरण दिले आहे व सर्व आरोप फेटाळले आहेत.’ एनसीबीच्या कारवाईबाबत जे आरोप करण्यात आले आहेत ते निराधार आहेत. आम्हाला जी खबर मिळाली होती त्याआधारेच आमच्या टीमने क्रूझवर छापा टाकला होता. या कारवाईत क्रूझवरून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडून ड्रग्ज आणि मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच करण्यात आली. आमचा तपास अजूनही सुरू आहे’, असे एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले. कारवाईवर कुणाला शंका असल्यास ते कोर्टात जाऊ शकता. आम्ही तिथे आमचे म्हणणे मांडू, असेही सिंह यांनी नमूद केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी मनोज गरबडे यांच्यासह तीन जणांना जामीन मंजूर

Aprna

जळगावात ट्रकवर दगडफेक

News Desk

“हिवाळी अधिवेशन गाजणार”,नवाब मलिकांचा इशारा

News Desk