HW News Marathi
Covid-19

“मी सारखा झोपेतून उठून बघतो, पडलं का काय सरकार?”

मुंबई । राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार कोसळण्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता समाचार घेतला आहे. “सगळे झोपेत असतानाच ठाकरे सरकार पडेल”, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर टोला लगावताना अजित पवार म्हणाले की, “मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार?”, असे म्हणत आपल्या शैलीत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे.

अजित पवार यावेळी म्हणाले की, “मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार? लगेच टीव्ही लावतोय. हे चॅनेल लाव, ते चॅनेल लाव. आता आम्ही कितीदा सांगायचं की हे तीन नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही”, असा इशाराच आता अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.

“कशाला उगाच चंद्रकांत पाटलांच्या नादी लागायचं?”

अजित पवार यांनी यापूर्वी देखील चंद्रकांत पाटील यांना या मुद्द्यावरून सुनावले होते. अजित पवार यापूर्वी चंद्रकांत पाटील यांना सुनावताना म्हणाले होते की, “सरकार जाणार हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत ?” तर यावेळी चंद्रकांत पाटील यांच्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “चंद्रकांत पाटील मोठा माणूस. तेच म्हणालेत की, मी जर बोलायला लागलो तर फार फटकळय. मग कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचं?”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Unlock 3.0 | ३१ जुलैनंतर देशात ‘अनलॉक-३’ची प्रक्रिया सुरु होणार ?

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी हे २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार चर्चा

News Desk

राज्यात १५ जूनपर्यंत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध लागू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

News Desk