HW News Marathi
देश / विदेश

…तरीही मी फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग म्हणणार नाही !

मुंबई । “देवेंद्र फडणवीसांनी माझ्यासोबत केलेला विश्वासघात जगजाहीर आहे. पण म्हणून मी कधी संतापून ‘फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग’ असे म्हणणार नाही”, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहे. भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त टीकेच्या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी एक जाहीर पत्रक काढून देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे.

“देवेंद्र फडणवीसांनी माझ्याशी विश्वासघात केला. एकही धनगर समाजाचा प्रतिनिधी विधानसभेत घेऊ नये यासाठी कारस्थाने केली, प्रसंगी विरोधकांनाही बळ देण्याचे उद्योग केले. हे सर्व मी जाणून आहे. मी निवडून येऊ नये यासाठी पैशांचा महापूर आला होता. पण तरीही मी कधी संतापून ‘फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग’ असे म्हणणार नाही. ही जरी वस्तुस्थिती असली तरीही मी कधी तसे बोलणार नाही”, असे अनिल गोटे यांनी आपल्या या पत्रकात म्हटले आहे.

“आमदार होऊन आठ दिवस झालेत, तर पडळकरांना पदाची नशा चढली आहे. मुनवादी मनोवृत्तीचा मी स्वतः प्रत्यक्ष बळी आहे. कुत्सीत विचारांच्या, हलकट मनोवृत्तीचे, लबाडी व खोटे बोलण्याचे एकत्रित रुप म्हणजे देवेंद्र फडणवीस”, अशी खळबळजनक टीका अनिल गोटे यांनी केली आहे. “एकनाथ खडसेंविरुद्ध कारस्थान रचणारे देखील फडणवीसच आहेत. नाथाभाऊंची फक्त इतकीच चूक होती की त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती”, असेही अनिल गोटे आपल्या पत्रात म्हणतात.

गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबातील कुणीही राजकारणात राहू नये, अशी हलकट, नीच आणि संकुचित बुद्धी फडणवीसांचीच असू शकते, अशीही टीका अनिल गोटे यांनी केली आहे. दरम्यान, अनिल गोटे यांनी आपल्या पत्रकात देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या या इतक्या टोकाच्या टिकेनंतर महाराष्ट्र भाजपकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिहेरी तलाकवरून सरकार अडचणीत

News Desk

अभिमानास्पद! ‘नासा’च्या कार्यकारी प्रमुखपदी भारतीय वंशाच्या भव्या लालची नियुक्ती

News Desk

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा घट

News Desk