HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत नाही !

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले नातू पार्थ पवार यांच्याबद्दल कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “पार्थ पवार अपरिपक्व. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत नाही”, असे म्हणत शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांत राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि शरद पवारांविरोधात अशी एक वेगळी भूमिका घेताना दिसून आले. राजकीय वर्तुळात याच पार्श्वभूमीवर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून त्यांची नाराजी अगदी उघडपणे दिसून येत आहे. अयोध्या राम मंदिराचा मुद्दा असो वा बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण याविषयी पार्थ यांनी घेतलेली भूमिका हि पूर्णपणे राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि राष्ट्रवादीविरोधात दिसून आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. त्यानंतर, पार्थ यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचीही प्रतिक्रिया आली. मात्र, आता खुद्द शरद पवारांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. “माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत नाही”, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

पाहा, संपूर्ण व्हिडीओ :

 

Related posts

धर्मा पाटील यांच्या मुलांनी १५ लाखाचे अनुदान नाकराले

News Desk

पांगरखेडा येथे आगीत गुरेढोरे मृत्युमुखी

News Desk

पाकिस्तानने काश्मीरच्या मुद्द्यात हस्तक्षेप करू नये !

News Desk