HW News Marathi
देश / विदेश

झारखंडमधूनही भाजप हद्दपार, शरद पवारांची टीका

मुंबई | झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रानंतर भाजपच्या हातातून झारखंड देखील गेले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्या निर्णय प्रदेशातील जनतेने केल्याचे झारखंडच्या निकालानंतर स्पष्ट दिसून आसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. ”झारखंडसह, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राज्यस्थान यांच्या भाजपचे सरकार होते, मात्र, निवडणुकीनंतर या पाचही राज्यातील जनतेने भाजप हद्दपार केले आहे. भाजपच्या अहंकाराला झारखंडच्या जनतेने उत्तर दिले, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी आज (२३ डिसेंबर) मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत.

झारखंड या राज्यात आदिवासी व गरीब लोकांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची वापरली गेलेली शक्ती आणि आर्थिक ताकद यांना न जुमानता इथल्या जनतेने भाजपला नाकारले आहे,” असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार म्हणाले की, या निकालांसाठी मी झारखंडमधील जनतेचे आभार मानतो.”असेही ते म्हणाले. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या महाआघाडीने स्पष्ट बहुमतासह सत्ता खेचून आणली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार आघाडीवर आहे.

“दिल्लीतील एका सभेत पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळ व संसदेत एनआरसीला विरोध झाला नाही असे सांगितले, हे चुकीचे आहे. मी आणि आमचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संसदेत एनआरसीचे दुष्परिणाम सांगितले होते. तसेच, राष्ट्रपती महोदयांनी दोन्ही सभागृहात अभिभाषणाच्यावेळी एनआरसी विषय सांगितला होता. राष्ट्रपती बोलतात ती सरकारची पॉलिसी ठरलेली असते तेच बोलले जाते. देशाचे गृहमंत्री एनआरसीचा निर्णय देशासाठी घेतल्याचे सभागृहात सांगतात आणि दुसरीकडे पंतप्रधान वेगळे बोलतात”, असे म्हणत शरद पवार यांनी यासंदर्भात आपली नाराजी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था खालावली, प्रियंका गांधींचा योगींना टोला

News Desk

निर्मला सीतारमण आज लोकसभेत मांडणार अर्थसंकल्प

swarit

ओबीसी आरक्षणाबाबतची सुप्रिम कोर्टातील आजची सुनावणी उद्यावर; भुजबळांनी दिली माहिती

News Desk