HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांसमोरच कार्यकर्ते आपापसात भिडले

मुंबई | परभणीमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहे. लोकसभा निवडणुकीत परभणीच्या पराभवावरून आज (२३ जून) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थिती त्यांचे कार्यकर्ते भिडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला सुधाण आले आहे. यामध्ये परभणी जिल्ह्याचा आढावा घेण्याची बैठक सुरू होण्याआधी राजेश विटेकर आणि आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरू झाली. या संपूर्ण प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

लोकसभा निवडणुकीत मराठवाडा विभागातून राष्ट्रवादीला एकही जागा जिंकू शकली नाही. उस्मानाबाद, परभणी, बीड लोकसभा मतदारसंघात पक्षाचा बोलबाला असूनही लोकसभेत त्यांना अपयशच मिळाले. बीड जिल्ह्याठी पक्षाचे बंडखोर नेते जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षात फूट पडत भाजप-शिवसेना युतीला खुला पाठिंबा दिला. मराठवाड्यातील परभणी या जागेवर राष्ट्रवादीचा दावा सांगण्यात येत होता. राजेश विटेकर येथून निवडून येतील, असेही सांगण्यात येत होते. परंतु पक्षाअंतर्गत राजकारणाचा फटका राष्ट्रवादीला बसला. याबाबत एक फेसबुक पोस्ट करण्यात आली होती. या फेसबुक पोस्टवरील मजकुरावरुनच पक्षातील दोन गटांचे कार्यकर्ते आपापसात कार्यरकर्ते भिडल्याची माहिती मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Poladpur Bus Accident: आंबेनळी घाटात दरीत बस कोसळली

News Desk

विखेंना घेतले परंतु छगन भुजबळ यांना पक्षात घेणार नाही !

News Desk

नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा – धनंजय मुंडे

News Desk