HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे पदाधिकारी दत्तात्रय पाटोळे यांची सांगलीत निर्घृण हत्या !

सांगली | सांगलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीचे कुपवाड शहर उपाध्यक्ष आणि लेबर काँट्रॅक्टर दत्तात्रय पाटोळे यांची पाठलाग करुन धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.

आज (१० जुलै) भरदुपारी घडलेल्या या घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे. कुपवाड एमआयडीसी परिसरात रोहिणी अ‍ॅग्रोटेक कोल्ड स्टोअरेजमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. पाटोळे गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादीच्या कुपवाड शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. या घटनेची माहिती मिळताच सांगली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भरदिवसा राजकीय पक्षाच्या पदधिकाऱ्याचा खून झाल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, दत्तात्रय पाटोळे हे आपल्या दुचाकीवरुन आज दुपारी मिरज औद्योगिक वसाहतीत निघाले होते. त्यांची दुचाकी हॉटेल अशोका समोर येताच तीन हल्लेखरांनी त्यांना अडवले आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात ते दुचाकीवरुन खाली पडले. हल्लेखोर हल्ला करतच होते. त्यातूनही उठून जीव वाचविण्यासाठी ते इकडेतिकडे पळू लागले.

अखेरचा प्रयत्न म्हणून त्यांनी रोहिणी ऍग्रोटेक कोल्डस्टोअरेजमध्ये धाव घेतली. मात्र, हल्लेखोरांनी त्यांचा पाटलाग करत त्यांच्यावर हल्ला केला. डोक्यावर आणि शरीराव धारधार शस्त्राने वार केल्याने पाटोळे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पाटोळे यांना वाचविण्यासाठी स्टोरेजमधील एक कामगार पुढे आला पण हल्लेखोरांनी त्याच्यावरही वार केला. यात तो कामगार जखमी झाल्याचे समजते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहारमध्ये विजय मिळवला म्हणून कोरोनावरही विजय मिळवता येईल असे वाटते काय? राऊतांचा भाजपला सवाल

News Desk

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूकीत भाजपच्या अतुल भोसलेंचा विजय!

News Desk

सिनेमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगासमोर आणावी! – राज्यपाल

Aprna