HW News Marathi
Covid-19

अजित पवारांनी थेट शिवसेनेच्या शाखेतच घेतली बैठक !

पंढरपूर | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या प्रचंड ॲक्टिव्ह झाले आहेत.कोरोना परिस्थितीसंदर्भात बैठका घेणं आणि पंढरपूरचा प्रचार करण हे सध्या जोरदार सुरू आहे. आपल्या पक्ष वाढीसाठीसुद्धा अजित पवार खूपच झटत असल्याचं दिसतं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात असल्याने त्याचा नेमका फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला कसा होईल यासाठी अजित पवार हे कसोशीने प्रयत्न करत आहेत. खरं तर कधीकाळी भाजपच्या (BJP) गोटात जाऊन थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजित पवार हे काल (16 एप्रिल) चक्क शिवसेनेच्या एका शाखेत गेले. तिथे त्यांनी बैठक घेतल्याचं कळत आहे.त्यांच्यासोबतच्या शिवसेनेच्या शाखेत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेसुद्धे होते. येथील त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

अजित पवार शिवसेनेच्या शाखेत का गेले ?

उद्या म्हणजे १७ एप्रिलला पंढरपूर-मंगळवेढ्याची पोटनिवडणूक होतेय. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात काल शेवटची प्रचारसभा पार पडल्यानंतर अजित पवार हे थेट मंगळवेढ्यातील शिवसेना शाखेत गेले. यावेळी त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते देखील उपस्थित होते. खरं तर ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढत आहे. त्यामुळे थेट शिवसेना शाखेत जाऊन अजित पवारांनी शिवसेनेच्या मतदारांपर्यंत योग्य तो मेसेज या निमित्ताने पोहचवला आहे. मात्र, अजित पवारांमध्ये एवढा मोठा बदल नेमका झाला तरी कसा अशी चर्चा सध्या चालू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकात पाटलांचा रात्रीवरच जास्त भरोसा !  जयंत पाटलांनी डिवचले

News Desk

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या भावाला कोरोनाची लागण, दादा झाले होम क्वारंटाइन 

News Desk

पुण्यात नवी नियमावली जारी ! संध्याकाळी ५ वाजल्यानंतर लागू होणार संचारबंदी

News Desk