HW News Marathi
महाराष्ट्र

“गिरीश कुठंय ?बायकांमागं फिरतोय का?” एकनाथ खडसेंची खळबळजनक ऑडिओ क्लिप

मुंबई । ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काहीच महिन्यांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. ह्या राष्ट्रवादी प्रवेशादरम्यान आणि अगदी त्यापूर्वी भाजपमध्ये असतानाही खडसेंनी पक्षावर आणि पक्षातील बड्या नेत्यांवर टीका करताना कोणतीही तमा बाळगली नाही हे आपण सर्वांनीच पाहिलंय. याच पार्श्वभूमीवर खडसे विरुद्ध देवेंद्र फडणवीस या वादासोबतच खडसे विरुद्ध जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्यातीलही वाद सर्वश्रुत आहे आणि आता त्यांच्या याच वादात ठिणगी पाडणारी एक ऑडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ह्या ऑडिओ क्लिपमध्ये खडसे महाजनांबद्दल खळबळजनक वक्तव्य, आणि वैयक्तिक टीका करताहेत.

“गिरीश काय करतोय ? तिकडे बायका मागे फिरतोय का नुसता?”

एकनाथ खडसे यांची ही जी ऑडिओ क्लिप व्हायरल झालीये त्यात जामनेर तालुक्यातील वडगाव बुद्रुकचा एक तरुण पाणी नसल्याने एकनाथ खडसे यांना फोन करून तक्रार करत असतो. त्यावर एकनाथ खडसे उत्तर देतात की, “जामनेरचा आमदार कुठे मेला? गिरीश काय करतोय ? तिकडे बायका मागे फिरतोय का नुसता?” पुढे आमदार साहेब फोन उचलत नसल्याचं जेव्हा तो मुलगा सांगतो तेव्हा खडसे म्हणतात, “गिरीश फक्त पोरींचेच फोन उचलतो”

खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे !

दरम्यान, एकनाथ खडसे ही ऑडिओ क्लिप जळगाव लाईव्हने व्हायरल केल्यानंतर आता सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू झाला आहे. इतकेच नव्हे तर खडसेंच्या या ऑडिओ क्लिपवर स्वतः भाजप आमदार गिरीश महाजन यांनी “खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे. “मी ह्यात खडसे साहेबांना दोष देणार नाही. कारण, झालंय असं की त्यांचं वाढतं वय, इतके आजार, जो मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा करतो त्याला आमदारकी मिळेना त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे”, असा उपरोधिक टोला गिरीश महाजनांनी लगावला आहे.

गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे यांच्यात वादाची पुन्हा एकदा ठिणगी पडलीये. भाजप विरुद्ध खडसे हा वाद काही नवा नाही पण गिरीश महाजनांवरची ही वैयक्तिक टीका खडसेंना भोवणार का ? हे येत्या काळात समजणारे.

पाहा संपूर्ण व्हिडीओ :

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच कारवाईअधिकाऱ्यांचे सीडीआर काढा, सगळे कारस्थान बाहेर येईल! – प्रविण दरेकर

Aprna

जळगावात २९ वीजचोरांवर कारवाई

News Desk

डिसलेंवर कारवाई करणाऱ्यांची होणार चौकशी; खुद्द शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल

News Desk