HW News Marathi
देश / विदेश

राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात, पक्षाकडून फौजिया खान यांना उमेदवारी

नवी दिल्ली। राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आली आहे. राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसने चौथ्या जागेचा आग्रह सोडल्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटातील राज्यसभेच्या चौथ्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. आता शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान हे राज्यसभेचे उमेदवार असतील. राज्यसभेच्या चार जागांपैकी शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा आणि राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत.

राज्यासभेच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज (१३ मार्च) शेवटचा दिवस असून काँग्रेसकडून राजीव सातव, राष्ट्रवादीकडून फौजिया खान आणि शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी आज अर्ज भरणार आहेत. यंदाची राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार असून २६ मार्चला केवळ मतदानाची औपचारिकता असणार आहे.

भाजपकडून राज्यसभेसाठी तीन जागांवर भाजपचा दावा केला आहे. भाजप उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले आणि भाजपच्या कोट्यातून रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी कालच अर्ज दाखल केले होते. तर भाजपकडून काल (१२ मार्च) राठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. कराड हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…नाहीतर वसईतही दिल्लीसारखीच परिस्थिती उद्भवली असती !

News Desk

यमुना एक्सप्रेसवेवर बस-ट्रकचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी

News Desk

अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल

News Desk