HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शेतकरी मोर्चा आज राजभवनावर जाणार, आझाद मैदानात शरद पवारही लावणार हजेरी

मुंबई  | शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात राजभवनवर मोर्चासाठी नाशिकहून निघालेले शेतकरी आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानात आज(२५ जानेवारी) होणाऱ्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी सहभागी होणार आहेत.
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्याच्या २१ जिल्ह्य़ांमधून शेतकरी व कामगार हे नाशिकहून मुंबईत दाखल झाले.
शेतकरी व कामगार कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले. आझाद मैदानात उद्या सकाळी जाहीर सभा होईल. या सभेत डाव्या पक्षांच्या नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते सहभागी होतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता मोर्चा राजभवनकडे कूच करेल. राजभवनावर जाण्याचा निर्धार कायम असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले आहे.

Related posts

मुख्यमंत्र्यांकडून लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रयत्न | विखे पाटील

News Desk

आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात

News Desk

INX Media Case : पी. चिदंबरम सीबीआय न्यायालयात हजर, ५ दिवसांच्या कोठडीची मागणी

News Desk