HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांनी दिले खडसेंच्या पक्षबदलाचे संकेत

नागपूर | एकीकडे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना भाजपचे निष्ठावान आणि ज्येष्ठ नेते मानले जाणारे एकनाथ खडसे यांच्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. खडसेंच्या पक्षबदलाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरतात. मात्र त्यानंतर त्यात काही तथ्य नाही असे म्हणत खडसे ती चर्चा संपवतात, हे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राने पाहिले आहे. खडसेंनी पक्षबदल केला नसला तरी विधानसभेला आपले तिकीट कापले गेल्याची आणि पक्षाने आपल्याला डावलल्याची भावना त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे.

पंकजा मुंडे पक्षातच राहून वेगळी संघटना उभारतील, मात्र माझ्यावर भरवसा ठेवू नका असे एकनाथ खडसे एचडब्लू मराठीशी बोलताना म्हणाले होते. एकनाथ खडसे यांचे अधिवेशन काळात नागपूरला येणे, त्यांनी गुप्तपणे शरद पवार यांची भेट घेणे यामुळे त्यांची पक्षाबद्दलची खडसेंची नाराजी दिसून आलीच आहे परंतु ते पक्षांतर करतील आणि महाविकासाआघाडीच्या एका पक्षात प्रवेश करतील ही शक्यता आता बळावली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अजित पवार यांनी आता खडसेंबाबत एक सूचक विधान केले आहे. एकनाथ खडसे हे पक्षावर नाराज आहेत त्यांनी महाविकासआघाडीच्या एक पक्षात प्रवेश करावा, अशी थेट ऑफर त्यांनी खडसेंना दिली आहे. अजित पवार नागपूरमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. आपली मुलगी म्हणजे रोहिणी खडसे हीच पराभव झाला नाही तर घडवून आणला असे स्पष्टपणे खडसेंनी बोलून दाखवले आहे. विधानसभेवेळी आपल्याला राष्ट्रवादी कँग्रेसची ऑफर होती, असेसुद्धा ते स्पष्टपणे म्हणाले. विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीची ऑफर स्वीकारली नाही आणि भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला मात्र आता ते अजितदादांची ऑफर स्वीकारून महाविकासाआघाडीच्या कोणत्या एका पक्षात प्रवेश करतात की भाजपचे निष्ठावान म्हणून भाजपमध्येच राहतात हे पाहण महत्वाचे असणार आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपुरातल्या रेशन दुकानदार संघटना देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला!

News Desk

मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा म्हणजे देशाला धोकाचं!- गृहमंत्री दिली वळसे पाटील 

News Desk

‘निर्बंध शिथिल करण्यावर एकमत नाही’, विजय वडेट्टीवारांची माहिती

News Desk