HW News Marathi
महाराष्ट्र

३३ कोटी वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार करून मुनगंटीवारांनी बांधला ५०० कोटींचा बंगला !

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “मुनगंटीवार यांनी राज्यातील ३३कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात मोठा भ्रष्टाचार केला असून त्याच पैशांतून त्यांनी तब्बल ५०० कोटींचा बंगला बांधला आहे”, असा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला. दरम्यान, मिटकरी यांच्या या आरोपानंतर मुनगंटीवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अमोल मिटकरी यांनी मुनगंटीवारांच्या या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली आहे. यावेळी “राज्यातील ३३ कोटी वृक्ष लागवडीत केलेल्या भष्ट्राचाराच्या पैशातून मुनगंटीवार यांनी ५०० कोटींचा बंगला बांधला. मी स्वतः त्यांचा तो बंगला पाहिला आहे”, असा दावा देखील यावेळी मिटकरी यांनी केला. यापुढे बोलताना, “मुनगंटीवार यांच्या त्या बंगल्याच्या ५ मजल्यावर पार्किंग असून त्यांच्या रोपट्यांना सुद्धा एसीची हवा मिळते”, अशी बोचरी टीका देखील मिटकरी यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडी सरकारमध्ये पुन्हा नाराजी, काँग्रेस नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र तर सोनिया गांधींचीही घेणार भेट

Aprna

‘अजित पवारांमध्ये हिम्मत असेल तर….’ किरीट सोमैय्यांचं आव्हान!

News Desk

राष्ट्रवादीची पहिल यादी जाहीर, दिग्गज नेत्यांना पुन्हा संधी

News Desk