मुंबई । मुंबईमध्ये २०० किलो ड्रग्स जप्त केल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (NCB) ठाकरे सरकारमधील कॅबीनेट मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना आज (१३ जानेवारी) चौकशीसाठी बोलावले होते. समीर खान हे नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर यांचे पती आहेत. रााष्ट्रवादीला एकााापपदरम्यान, राष्ट्रवादीसाठी गेल्या २ दिवसांतील हा दुसरा धक्का आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीर खान आणि करन सजनानी यांच्यामध्ये २० हजार रूपयांचे आर्थिक व्यवहार झाले होते. या प्रकरणी संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आता अखेर समीर खान यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती NCB च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.