HW News Marathi
महाराष्ट्र

‘साजिशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिये’ छगन भुजबळांची निर्दोष मुक्तते नंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई | अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची आज(९ सप्टेंबर) महाराष्ट्र सदन प्रकरणात निर्दोष सुटका झाली आहे. सुटका झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी आणि या प्रकरणातून आपली नावे वगळण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता.

आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर भुजबळांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे भेट घेतली. त्यावेळी दोघांतर्फे भुजबळांचे अभिनंदन करण्यात आले.

त्या कंत्राटदाराला एक फूट जमिनही मिळालेली नाही

छगन भुजबळ यांनी यावेळी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र सदन प्रकरण हे जगभर गाजलं. पंचतारांकित हॉटेलसारख्या बांधलेल्या या सदनाचा अनेक राजकीय पक्ष त्याचा वापर करत आहेत. महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटदाराला मंत्रीमंडळाने ठरवले होते की हे बांधकाम झाल्यानंतर तुम्हाला १०० कोटी रुपयांचा एफएसआय देऊ असे सांगितले होते. आजपर्यंत त्या कंत्राटदाराला एक फूट जमिनही मिळालेली नाही. तरीसुद्धा आरोप करुन महाराष्ट्र सदनामध्ये ८०० कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप करण्यात आला. मिडीया ट्रायल सुद्धा झाली. त्यामुळे सव्वा दोन वर्षापेक्षा जास्त काळ आम्हाला तुरुंगामध्ये राहावं लागलं,” असे छगन भुजबळांनी म्हटले आहे.

“आमचा काही दोष नसल्याने आम्हाला या प्रकरणातून वगळ्यात यावं यासाठी वकिलांतर्फे याचिका करण्यात आली होती. त्यानंतर आता आम्हाला या प्रकरणातून निर्दोष म्हणून वगळण्यात आलं आहे. ईडीची कारवाई ही महाराष्ट्र सदन प्रकरणातून पैसे मिळाले यातून ही केस बांधली गेली आहे. अतिशय विनम्रपणे संयम करुन आम्ही या यशाचा स्विकार केला आहे. कुणाही बद्दल आमच्या मनामध्ये द्वेषबुद्धी नाही. कुणाच्याही बद्दल तक्रार नाही. काही वेळेला नियतीच्या मनामध्ये जे असतं त्याप्रमाणे घडतं. साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिये, ये तो आपकी जनता की दुआयें है की उन्हें मुकम्मल नहीं होने देती,” असे म्हणत भुजबळांनी सर्वाचे आशिर्वाद सोबत असल्याचे म्हटले आहे.

न्यायालयाच्या विरोधात हायकोर्टात धाव

सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात कोर्टात धाव घेलती आहे. “छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची सत्र न्यायालयाकडून महाराष्ट्र सदन केसमधून निर्दोष मुक्तता झाली. या निर्णयाविरोधात मी हाय कोर्टात चॅलेंज करणार आहे” असे ट्विट अंजली दमानिया यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?

छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळात जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप होता. महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ जून २०१५ रोजी स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर १५ जून २०१५ रोजी सक्तवसुली संचालनालयानेही भुजबळांविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते.

साडे तेरा कोटींची लाच घेतल्याचा होता आरोप

दिल्लीत महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे तेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रात करण्यात आला होता. २० हजार पानांच्या या आरोपपत्रात ६० साक्षीदार होते. या आरोपपत्राचा आधार घेऊन सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली होती. भुजबळ यांनी महाराष्ट्र सदनचे बांधकाम मे. के. एस चमणकर या कंपनीला मिळवून दिले. यासाठी भुजबळांनी कंपनीच्या अनुकूल शासकीय निर्णय घेतले. प्रादेशिक परिवहन विभागाने मे. चमणकर यांना निविदा देण्यास नकार दिला. तरीही भुजबळांनी परिवहन विभागाकडून मे. चमणकर यांनाच काम मिळेल, अशी व्यवस्था केली. याद्वारे भुजबळांनी विकासकाला २० टक्क्यांऐवजी ८० टक्के नफा देखील मिळवून दिल्याचा आरोप भुजबळांवर होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीचा मुकाबला करण्याचा शासनाचा प्रयत्न! – अजित पवार

Aprna

पुणे शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी नाही

swarit

सुशांतच्या आत्महत्येवर मीडियात होणारी चर्चा आश्चर्यकारक, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याकडे मिडियाचे लक्षच नाही

News Desk