HW News Marathi
महाराष्ट्र

“दादा आता सहन होत नाही”, अजित पवारांनी अबोला धरलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा माफीनामा

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (२२ जुलै) वाढदिवस. त्यांच्या वाढदिवशी राष्ट्रवादीच्या एका पदाधिराऱ्याने चक्क जाहीर माफिनामा मागितला आहे. “दोन हाणा, पण मला आपलं म्हणा” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने माफी मागितली. पहाटेच्या शपथविधीनंतर अजितदादांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याच्या त्या घटनेमुळे नितिन हिंदुराव देशमुख यांच्यासोबत अजित पवार अद्यापही बोलले नाहीत. मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्याला माफ करुन अबोला सोडावा, अशी गळच देशमुखांनी घातली आहे.

काय घडलं होतं?

अजित पवारांनी २३ नोव्हेंबर २०१९ ला देवेंद्र फडणवीसांच्या साथीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या पहाटेच्या शपथविधीनंतर नितीन देशमुखांनी वाय बी चव्हाण येथे अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली होती. नितीन देशमुखांच्या या भूमिकेबद्दल अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. घोषणाबाजी केल्यापासून आतापर्यंत म्हणजे जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ गेला तरी अजून अजित पवारांनी नितीन देशमुखांसोबतचा अबोला सोडला नाही आहे. यामुळेच आज अजित पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नितीन देशमुख यांनी दादांच्या मनधरणीचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. “दोन हाना, पण मला आपलं म्हणा, मला माफी, हेच तुमचं वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट” अशी वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड, नगर पाठोपाठ धनंजय मुंडे यांचे औरंगाबादमध्येही जंगी स्वागत!

News Desk

….म्हणून राज्यपाल गोव्याला गेले, राजभवनाकडून स्पष्टीकरण

News Desk

एक खून माफ करा, राज ठाकरेंची राष्ट्रपतींकडे मागणी

News Desk