HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन, ऑफिस जाळून देण्याची दिली धमकी

पुणे | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना एका अज्ञात इसमकडून धमकीचा आल्याची घटना घडली आहे. त्यांचे धायरीत असलेले ऑफिस जाळण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात सिंहगडराष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपाली चाकणकर यांचे धायरी मध्ये कार्यालय आहे त्याच्या कार्यालयात एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ‘कुठे आहे रुपाली चाकणकर असे विचारत अर्वाच्य भाषा वापरत ऑफिस पेटवून देण्याची भाषा केली होती. जयंत रामचंद्र पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप राजेंद्र कठाळे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्या कुणी अनोळखी व्यक्तीने फोन करून अशा पद्धतीने भाषा वापरून धमकीचा फोन केला आहे. त्याच्याविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस योग्य तो तपास करतील, न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रीय रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजितदादा आमचं ऐका, नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत; राऊतांचा सूचक इशारा

News Desk

उदयनराजेंनी राजीनामा देऊन तेथील लोकांना त्रास देऊ नये !

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची बैठक

swarit