HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादी आमदार निलेश लंकेनी पाळला शब्द, बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी २५ लाखांचा निधी मंजूर !

मुंबई । राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपले एक आश्वासन पूर्ण केले आहे ज्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. पारनेर तालुक्यात गेल्या वर्षी तब्बल ८८ ग्रामपंचायत निवडणुका झाल्या होत्या. यावेळी या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध केल्या तर गावाच्या विकास कामांसाठी 25 लाख रूपये देऊ, असा शब्द आमदार निलेश लंके यांनी दिला होता. आता अखेर निलेश लंके यांनी आपला हा शब्द पाळला आहे.

निलेश लंके यांनी गावातील विकास कामांसाठी २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. गावातील सभामंडप, रस्ते ,सांस्कृतीक भवन, सुशोभिकरण या कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी तालुक्यात तब्बल ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यावेळी या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन आमदार निलेश लंके यांनी गावकऱ्यांना केले. त्याचप्रमाणे, या निवडणुका बिनविरोध केल्यास गावाच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी देण्याचे अश्‍वासनही दिले होते. त्यावेळी हा प्रकार समोर आल्यानंतर भाजपच्या बड्या नेत्यांसह तालुक्यातील विरोधकांनीही शंका उपस्थित केली होती.

निलेश लंके यांच्या आश्वासनानंतर हंगे, शिरापूर, रांधे, कारेगांव, वेसदरे, पिंप्रीपठार, जाधववाडी, भोयरेगांगर्डा व पळसपूर यासह नगर तालुक्यातील आकोळनेर ग्रामपंचायतीही बिनविरोध झाली होती. त्यानंतर आता निलेश लंकेनी आपला हा शब्द पाळत गावासाठी २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खरीप हंगामासाठी १७ लाख क्विंटल बियाण्यांची उपलब्धता

News Desk

‘या’ व्हिडिओमुळे भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप

News Desk

केंद्राचा मोठा निर्णय ! CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द

News Desk