HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेल्या ‘त्या’ आरोपावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

मुंबई | मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. या गंभीर आरोपावर राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी यावर भाष्य केले आहे.

“दुरचित्रवाणीवर या सगळ्या प्रकरणाबद्दलची माहिती पाहिली. याची चौकशी झाल्यानंतर तथ्य काय आहे हे समोर येईल. अनिल देशमुख, परमबीर सिंग काय म्हणाले ते पाहिलं. यामध्ये जेव्हा एका पोलिस अधिकाऱ्याची आरोप लावून बदली केली जाते तेव्हा आकसापोटी असा आरोप केला जाऊ शकतो. तसेच, जे काही असेल त्याचा गृहमंत्री, मुख्यमंत्री खुलासा करतील. अजून तरी मला काही माहित नाही. माहिती घेऊन बोलेन, असं खडसे यांनी म्हटलं आहे. तर, देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात आहेत आणि असं काही घडलं की राजीनामा मागतातच”, असंही त्यांनी म्हटलं आहे.

परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती.

अनिल देशमुख बदलीबद्दल काय म्हणाले होते?

दरम्यान, सचिन वाझे प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या चौकशीतून काही गोष्टी पुढे आल्या आहेत. या बाबी माफ करण्यासारख्या नाही आहेत. त्यामुळे चौकशीत बाधा येऊ नये यासाठीच मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. ही नियमित प्रशासकीय बदली नाही, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अँटिलिया स्फोटक प्रकरणी पोलिसांकडून चुका झाल्याची स्पष्ट कबुली दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक ! ‘लॉकडाऊन’मुळे वाहन न मिळाल्याने दुचाकीवरुनच वडिलांचा मृतदेह घरी नेला

swarit

“सरकार हमसे डरती है…..पुलिस को आगे करती है”, चित्रा वाघ यांचा सरकारवर हल्ला

News Desk

“रक्तात मिठाचे प्रमाण कमी झाले तरी असे भ्रम होतात”, फडणवीसांच्या “त्या” वक्तव्यावर काँग्रेसची टीका

News Desk