HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या यूपीए अध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा काल (१० डिसेंबर दिल्लीत रंगली होती. राहुल गांधी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने शरद पवार यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद सोपवलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील असा दावाही केला जात आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

“यूपीएच्या प्रमुख पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची नियुक्ती होणार अशा आशियाच्या चुकीच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छिते की यूपीए मधील घटक पक्षांमध्ये अशा प्रकारचा कुठलाच प्रस्ताव नाही व कुठली चर्चा देखील झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असा संशय आहे की जाणून-बुजून काही लोकांनी अशा प्रकारच्या खोट्या बातम्या मीडियामध्ये पेरून केंद्र सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणाच्या बाबत जो तीव्र शेतकरी आंदोलन आहे त्याच्यावरून जनतेचे लक्ष विचलित व्हावं असा काही प्रयत्न ह्या बाबतीत झाला” अशी झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेत्या चित्रा वाघ याचं राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र!

News Desk

मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी | अशोक चव्हाण

News Desk

महाराष्ट्रात आता भाजप एकट्याने लढेल, पुन्हा फसवणूक नकोय! – चंद्रकांत पाटील

News Desk