HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

स्वत: समृद्ध होण्यासाठी पांडुरंग बरोरा शिवसेनेत गेले का ?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी स्वत: समृद्ध होण्यासाठी शिवसेनेत प्रवेश का?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एच. डब्ल्यू. मराठीला बोलताना उपस्थित केला आहे. “जनता त्यांना स्वीकारणार नाही, निश्चित आम्ही शाहापूरची जागा जिंकू”,  असा विश्वास देखील मलिक यांनी व्यक्त केला आहे. बरोरा यांच्या सेनेतील प्रवेशानंतर मलिक यांनी टीका केली आहे.

तसेच मलिक यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील समृद्धी मार्गावरून टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूर आमदार पांडुरंग बरोरा यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी आज (१० जुलै) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना भवनात पांडुरंग बरोरा यांच्या समवेत शहापूरमधील त्यांच्या समर्थकांनी शिवबंधन बांधले. “सत्तेत राहून कामे करता येतात म्हणून शिवसेनेत प्रवेश केल्याचे पांडुरंग यांनी दिलेली ही पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले.”

Related posts

गणेशोत्सवात जुगार खेळू देण्याची आमदार, खासदारांची मागणी

News Desk

आजपासून बेस्टचे किमान प्रवास भाडे फक्त ५ रुपये

News Desk

सोशल मिडियावरही बाप्पा मोरया!

News Desk