HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस अहंकारी,लबाड,दगलबाज ! फडणवीसांच्या प्रकरणांची जथ्थी बाहेर काढू …

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादीच्या गोटात उलथापालथ सुरू झाली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका सुरू केली आहे. तसेच, अनेक खुलासे करून त्याचे पुरावे देखील असल्याचे दावे फडणवीसांकडून करण्यात येत असताना आता खुद्द देवेंद्र फडणवीसांवरच आरोप झाले आहेत. हे आरोप केले आहेत आधी भाजपमध्ये असलेल्या आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना त्यांच्याशी मतभेद झाल्यानंतर गोटेंनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता अनिल गोटे यांनी परिपत्रक काढून त्यामध्ये थेट फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले आहेत अनिल गोटे?

काल (२३ मार्च) फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस बदल्यांच्या रॅकेटचा खळबळजनक आरोप केल्यानंतर आता अनिल गोटेंकडून खरमरीत शब्दांमध्ये परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांचं समर्थन करून जनतेच्या रोषाला तोंड देण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यामुळे आपल्या डरपोकपणावर शिक्कामोर्तब होऊ नये, म्हणून त्यांचे आकांडतांडव सुरू आहे. पोलीस यंत्रणेचा वापर करून विरोधकांनाच नव्हे, तर मासबेस असलेल्या ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी फडणवीसांनी पोलीस यंत्रणेला कसं वेठीला धरलं, अशा असंख्य प्रकरणांची माझ्याकडे जथ्थी आहे”, असं गोटेंनी या पत्रकात म्हटलं आहे.

अनिल गोटेंनी यावेळी कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. “देवेंद्र फडणवीसांना मी स्वत: कुठल्या मंत्र्यांनी कुठल्या आयुक्तांच्या मदतीने पैसे गोळा केले, किती नंबरच्या गाडीतून पैसे कुठे आले, कुणाकडे उतरवले याची विस्तृत माहिती दिली. सदर मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी फडणवीसांनी त्यांना क्लीनचिट दिली”, असं गोटे म्हणाले आहेत. “फडणवीसांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा काहीएक अधिकार नाही. ती नैतिकताच तुम्ही केव्हाच गमावली आहे. उगाच नाक वर करून आणि लांब जीभ काढून तुम्ही केलेल्या आक्रस्ताळेपणावर कुणी काडीचा सुद्धा विश्वास ठेवत नाही”, असं देखील या पत्रकात पुढे म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टिपू सुलतानाचे नाव उद्यानाला देणे अयोग्यच! – देवेंद्र फडणवीस

Aprna

हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस; विधानसभा अध्यक्षाची निवड होणार?

Aprna

फडणवीसांसोबतची भेट बंद दाराआड नव्हती, उद्धव ठाकरेंचं ‘त्या’ भेटीवर विधान

News Desk