HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात मध्यावधी निवडणूक होणार नाही !

मुंबई | “राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता,” राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळली आहे. आमदरांना निवडणुकांना सामोरे जावे लागणार नाही, असा विश्वास देखील पवार आमदारांच्या बैठकीनंतर म्हणाले. पवार पुढे म्हणाले की, “मध्यावधी निवडणूक होणार नाही,” असा दावा पवारांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच पवार म्हटले की, राष्ट्रपती राजवट असली तरी चिंता करायचे कारण नाही, अशा विश्वास पवारांनी राष्ट्रवादींच्या आमदारांना दिला आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादींच्या ५४ आमदारांची बैठक संपली.

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेणार,” असा विश्वास राष्ट्रवादीचे नेता अजित पवार पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, “मित्र पक्षात एकवाक्यता ठेवणार,” दावा त्यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रातील चर्चा लवकर संपवण्याचा प्रयत्न, असे सुरू असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक संपली. महत्त्वाची पदे आणि जागावाटपावर चर्चा करणार, असे देखील म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या ५४ आमदारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सत्ता स्थापनच्या नव्या समीकरणावर जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे. तसेच स्थापन होणाऱ्या नव्या सरकारमधील सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठविण्यासाठी चर्चा सुरू झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतला सुरू झाली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी पुढील रणनीती ठरणार असल्याचे माहिती शक्यता वर्तवली जाते. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळसह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते यासाठी उपस्थित आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिवशाही शब्द शिवसेनेने केव्हाच सोडला”, शेलारांची जहरी टीका

News Desk

मुंबईतील नामवंत डॉक्टर्स कोरोना लढाईत शासनाबरोबर, टास्क फोर्स, हॉटलाईनद्वारे मार्गदर्शन करणार

News Desk

देगलूरमध्ये भाजपला आघाडी दिल्यास गाव जेवण देईल, चंद्रकांत पाटलांची कार्यकर्त्यांना खुली ऑफर

News Desk