HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवारांची जोरदार टीका

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पवार यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट येऊ शकते, असं विधान केलं होतं. पाटील यांच्या या विधानावरून शरद पवारांनीही चांगलाच समाचार घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं विधान करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असा चिमटा काढला आहे.

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज येथील लोकनेते रामशेठ ठाकूर भवनचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमानंतर पवारांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांना विचारण्यात आले. यावर शरद पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यातील विधिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थिर आहे. त्यामुळे जे अस्वस्थ झाले आहेत, त्यांच्याकडून अशी विधाने होत आहेत. याआधी सुद्धा त्यांनी अशी विधान केली आहेत, पण राज्यातील जनतेवर त्याचा काही परिणाम झालेला नाही, जनता अशी विधाने गांभीर्याने घेत नाहीत, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलं होतं ?

महाविकास आघाडीनं विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी दिली नसल्यामुने या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेतली. त्यावर राज्यपालांनी अभ्यास करून निर्णय देऊ, असं आश्वासन दिलं. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. इतका अभ्यास बरा नाही. त्याचं ओझं झेपलं पाहिजे, अशी टीका राऊत यांनी केली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही त्यावर प्रत्युत्तर देत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी शक्यता वर्तवली. विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्यपालांनी दोन वेळा निवडणुकीच्या तारखा देऊनही राज्य सरकारने निवडणूक घेतली नाही. हा राज्यपालांचा आणि घटनेचा अवमान आहे. या मुद्दयावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या नवनिर्वाचित निवडणूक प्रभारींची उद्या बैठक, पंकजा मुंडे, विनोद तावडे होणार सहभागी

News Desk

निश्चय करुया मुख्यमंत्री उध्दव ठाकरे…!

News Desk

फुलेवाडा आणि सवित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाला गती द्या!: अजित पवार

News Desk