बारामती | राज्यात सोमवारी (२१ ऑक्टोबर) १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर, आज (२४ ऑक्टोबर) अखेर बहुप्रतीक्षित अशा या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा विजयी बारामतीतून विजीय झाला आहे. तसेच अजित पवार यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अजित पवार यांचा १ लाख मताधिक्याने जिंकून आले आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील पवार कुटुंबाला त्यांच्या बालेकिल्ल्यातच आव्हान देण्याचे ठरवले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बारामती जिंकणार असल्याचा दावा केला होता. मात्र, बारामतीला सुरुंग लावण्याचे भाजपचे स्वप्न स्वप्नच राहिले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.