HW News Marathi
महाराष्ट्र

१९ ऑगस्टपासून राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला पुन्हा सुरुवात

मुंबई | राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पुरस्थितीमुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. विविध स्तरांतून, विविध क्षेत्रातून या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी लाखो हात पुढे सरसावत आहेत. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी आयोजित केलेल्या आपल्या राजकीय यात्रा स्थगित केल्या होत्या. आता जिल्ह्यातील पाणी ओसरल्यानंतर, परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्यानंतर राजकीय पक्ष पुन्हा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. आता १९ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे.

राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ६ ऑगस्टला सुरु झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्यात बागलाण येथे स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पुरग्रस्तांची मदत देखील केली. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. मात्र आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा १९ ऑगस्टपासून सुरू करण्यात येत आहे. १९ ते २६ ऑगस्टपर्यंत ही शिवस्वराज्य यात्रा असणार आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन शिवस्वराज्य यात्रेला पुन्हा सुरुवात होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसोबत मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा देखील २१ ऑगस्टपासूनच सुरु होणार आहे. राज्यात पुराचे पाणी ओसरल्यानंतर रोगराईचे संकट उभे ठाकेल आणि हेच सर्वात मोठे आव्हान असणार आहे. यावेळी पूरग्रस्तांना या राजकीय पक्षांकडून आवश्यक ती मदत मिळणार ? कि हे राजकीय पक्ष आपल्या राजकीय यात्रांमध्ये, पक्षप्रवेशांमध्ये आणि विधानसभेच्या तयारीतच गुंतून राहणार ? हा मोठा प्रश्न आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गेल्या अडीच वर्षांपासून फडणवीसांचं ‘मी पुन्हा येईन’ वाक्य ऐकतोय, ते…”, जयंत पाटलांची खोचक टीका!

News Desk

आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात ८ दिवस संचारबंदी!

News Desk

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या !

swarit