HW News Marathi
Covid-19

उद्धवजी मुख्यमंत्री होऊ नयेत, म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्या काही लोकांबद्दल सहानुभूती !

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकी देशात राजकीय पेच निर्माण झाला होता. येत्या २१ मे रोजी मुंबईत विधानपरिषदेच्या ९ जागांवर निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. मात्र, परवानगी देताना आयोगाने कोरोनासंदर्भात काळजी घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे. उद्धवजी मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्या काही लोकांबद्दल मला अतीव सहानुभूती आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत भाजपला लगावला आहे.

रुपाली चाकणकर ट्वीट म्हणाले, “२७ मे च्या आत विधानपरिषदेच्या ९ जागांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झालाय. उद्धवजी मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्या काही लोकांबद्दल मला अतीव सहानुभूती आहे,” असे त्या म्हणाल्या आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना २७ मे पूर्वी कोणत्याही एका सभागृहावर नियुक्त होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु होते. उद्धव ठाकरे यांचे नाव राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणूनही व्हावी. यासाठी महाविकासआघाडीने दोन वेळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पत्र पाठवले होते.मात्र, यावर राज्यपालांनी त्याबाबत अद्याप निर्णय न घेता. यामुळे महाविकासआघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. यानंतर आज अखरे केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानपरिषदेची निवडणूक घेण्यास परवानगी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याने अजित पवारांकडे दिला चेक, अजित पवार लंकेंना म्हणाले…!

News Desk

मराठा समाजासाठी ३ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा ! चंद्रकांत पाटलांची मागणी

News Desk

राजू शेट्टींनी थेट साधला मुख्यमंत्री अन् शरद पवारांवर निशाणा

News Desk