HW News Marathi
महाराष्ट्र

‘या’ अपक्ष आमदाराचा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा

मुंबई। नेवासा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार शंकराव गडाख यांनी काल (२८ ऑक्टोबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गडाख यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. आता पर्यंत ५ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६१ वर पोहचले आहे.

नेवासा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर क्रांतिकारी शेतकरी पार्टीचे उमेदवार शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आलेले आहेत. ते कुठल्या पक्षात जातील या कडे संपूर्ण नेवासा तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र काल त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर यांनी रविवार (२७ ऑक्टोबर) शंकरराव गडाख यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी शंकरराव गडाख यांचे वडिल यशवंतराव गडाख आणि बंधू प्रशांत गडाख या उपस्थित सर्वांशी चर्चा केल्यावर मिलींद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून गडाख कुटुंबाशी चर्चा करून दिली.

यानंतर शंकरराव गडाख आणि प्रशांत गडाख यांना मिलींद नार्वेकर यांनी ताबडतोब मुंबईत मातोश्रीवर आणले आणि उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट करून दिली. यावेळी शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला अधिकृत पाठिंबा देत असल्याचे पत्र उद्धव ठाकरे यांना दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मर्यादित काळासाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय दिशाहीन, हास्यास्पद व निरर्थक”- अतुल भातखळकर

News Desk

संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला

News Desk

अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असता तर तिला न्याय मिळाला असता

News Desk