मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन चर्चेत असतात. काल (१२ नोव्हेंबर) अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा ट्विटमध्ये शवसेना असा उल्लेख केला होता. त्यावरुन शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीस यांना सुनावले आहे. नीलम गोऱ्हे आणि अमृता फडणवीस यांच्यात टि्वट वॉर रंगले आहे.
अमृता फडणवीस यांच्या टि्वटला आता डॅा. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गोऱ्हे यांनी टि्वट करून फडणवीस यांची खिल्ली उडविली आहे. गोल्हे टि्वटमध्ये म्हणतात, “एका शब्दाचे महत्व असते. #अमृताशब्दातील ‘अ’ चे भान महत्वाचे अमृताताई. या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत, शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही.
आपल्या नावातील “अ” मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, मन स्वास्थ चांगले राहते, आणि हो शिवसेनाच रुग्णवाहिका आणि अंतिम शव वाहिनी च्या वेळेस सगळ्यात आधी आठवते आजही हे देखील विसरु नका; आपल्या नावात “अ” च महत्व आहे ते निघाले तर “मृता” राहिल , शिवसेनेची काळजी करू नका, आपले मानसिक स्वास्थ जपा, “अ” मंगल विचार मनात आणणे “अ” योग्य बरे का !!ही दिपावली आपल्या ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो…”
#शिवसेना # एका शब्दाचे महत्व असते.*
*#अमृताशब्दातील अ चे भान महत्वाचे*
अमृताताई या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत,शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही,आपल्या नावातील"अ"मृतावस्थेत जावू देवू नका,मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा २ @fadnavis_amruta pic.twitter.com/ZE74uqEPjH— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) November 12, 2020
बिहार निवडणुकीत शिवसेनेला आलेल्या अपयशाबाबत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला डिचवले होते. शिवसेनाचा उल्लेख ‘शवसेना’ करून अमृता यांनी टि्वट करून शिवसेनेवर टीका केली आहे. आपल्या टि्वटमध्ये अमृता म्हणतात की का हय ये – शवसैना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार मे ! काय चाल्लय तरी काय – शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे ! महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबाबत धन्यवाद.
का हय ये – शवसैना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार मे !
काय चाल्लय तरी काय – शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे !
महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद 🐧 #Bihar #BiharResult pic.twitter.com/mMGT5Sgn3w— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 12, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.