HW News Marathi
महाराष्ट्र

“जावईंच्या बाबतीत वेगळी वागणूक देणारं हे सरकार नाही”- नीलम गोऱ्हे   

मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तर सचिन वाझे आपला जावई आहे का? अशी विचारणा करत सभापती निलम गोऱ्हेंसमोर संताप व्यक्त केला.

“राज्यातील जनतेचा सरकावर विश्वास राहिलेला नाही. कोण लागून गेला सचिन वाझे? तुमचा जावई आहे का सभापती महोदय? का हे सरकार पाठीशी घालत आहे?,” असे संतप्त सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारले. पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला जात आहे असा आरोप करताना सचिन वाझेंना अटक करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.सभापती निलम गोऱ्हे यांनी यावेळी प्रवीण दरेकर यांना सांगितलं की, “कायदा सुव्यवस्थेवर प्रस्ताव असून गृहमंत्री उत्तर देणार आहेत. तुम्ही बोलण्याच्या ओघात तो तुमचा जावई आहे का? असं म्हणालात. माझं असं मत आहे की जावई आरोपी असला तर त्यालाही सोडता कामा नये”.”जावईंच्या बाबतीत वेगळी वागणूक देणारं हे सरकार नाही असं आमचं निरीक्षण आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे.

“सचिन वाझे प्रकरणावरुन वातावरण अत्यंत संतप्त आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंनी पतीचा खून केल्याचा संशय व्यक्त केल आहे. प्रथमदर्शनी अनेक पुरावे समोर येत आहेत. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी पत्नीचा जबाब सांगितला तरी सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

INS विक्रांत कथित घोटाळ्या प्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 14 जूनला सुनावणी

Aprna

रशिया-युक्रेन संघर्षावर शरद पवारांनी केले भाष्य; म्हणाले….

News Desk

‘त्या’ शपथविधीचा खुलासा करण्यापासुन अजित पवारांना फडणवीसांनी थांबवल….

Arati More