HW News Marathi
महाराष्ट्र

MPSC पूर्व परीक्षेची नवी तारीख उद्याच जाहीर होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई । राज्य सरकारने पुन्हा एकदा MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकल्याचा निर्णय आज (११ मार्च) जाहीर केला केल्याने राज्य सरकारला राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबादसारख्या प्रमुख शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले. राज्य सरकारकडून सलग पाचव्यांदा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी स्वतः MPSC परीक्षा पुढे का ढकलण्यात आल्या ? अंतिम तारीख कधी जाहीर होणार? याबाबत संपूर्ण माहिती देत विद्यार्थ्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी हा संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे :

* मी सांगितले होते कि परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही. पण काही कारणास्तव ती काहीच दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

* आठवड्याभरात ही परीक्षा होईल. उद्याच याबाबतची ती तारीख आहे ती जाहीर होईल. पुढे ढकलण्याचे कारण अर्थातच कोरोना आहे.

* कोरोनाचे राक्षस पुन्हा डोके वर काढतोय. त्यामुळे, कर्मचारी, अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्या पाहिजेत. ती खबरदारी घेणे ह्या माझ्या सूचना आहेत.

* कोरोनाचा धोका वाढतो आहे. कृपया कोरोनाची टेस्ट करायला घाबरू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

* कोरोनाचे सर्व नियम पाळा. कोणतीही हयगय करू नका, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणे,नवनीत राणांनंतर आता महाराष्ट्रात ‘राष्ट्रपती राजवटीची’ आठवलेंची मागणी!

News Desk

PandharpurElection : फडणवीसांवर इतका अविश्वास दाखवणं बरं नाही, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

News Desk

उन्हाळ्यात गोवा-कोकणात जाणार रेल्वेच्या जादा गाड्या

News Desk