HW News Marathi
Covid-19

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून उद्यापासून नवी नियमावली जाहीर

मुंबई | देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. थर्टी फर्स्ट पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून नवे निर्बंध लावण्यात आले आहे. मुंबई पोलिसांसंदर्भातील नव्या नियमावलीचे परिपरत्रक काढले आहेत. यानुसार १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या काळात नवे नियमाचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. यानुसार मुंबई परिसरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसमध्ये फक्त ५० टक्के क्षमतेनेच सुरु ठेवण्याची अट ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई काल (१४ डिसेंबर) आमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे आता राज्यात ओमायक्रॉन एकूण रुग्णांची संख्या २८ वर गेली आहे. यानुसार आता मुंबई १२, पिंपरी चिंचवड -१०, पुणे मनपा -२ कल्याण डोंबिवली – १ नागपूर -१ ,लातूर -१ आणि वसई विरारमधील एका रुग्णाचा समावेश आहे. यात ९ रुग्णांचा RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांच्या परिपत्रकात नेमके काय म्हटले

  • कार्यक्रमाचे आयोजक, सहभागी, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक या सर्वांचंच लसीकरण पूर्ण असणे अनिवार्य आहे
  • कोणतंही दुकान, आस्थापन, मॉल, कार्यक्रम, मेळाव्यांच्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्वांचं लसीकरण पूर्ण असले पाहिजे
  • सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींचंही लसीकरण न झालेल्यांच्या प्रवासावर बंदी.
  • कोणताही कार्यक्रम, स्पर्धा, मेळावे, समारंभाच्या ठिकाणी एकूण क्षमतेच्या ५० टक्केच लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी.
  • एकूण उपस्थितांची संख्या १ हजारापेक्षा जास्त असल्यास स्थानिक प्राधिकरणाला माहिती देणं अनिवार्य
  • बंदीस्त सभागृह, रेस्टॉरंट, हॉलमध्ये ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. तर मोकळ्या जागी २५ टक्के क्षमतेपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही.
  • महाराष्ट्रात येणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण पूर्ण होणं किंवा ७२ तासांपूर्वीची RTPCR चाचणीच आवश्यक
  • ३१ डिसेंबर आणि ख्रिसमसला होणाऱ्या पार्ट्यांवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक वॉर्डात महापालिकेची ४ पथकं तैनात.
  • नियम मोडणाऱ्या पार्ट्या झाल्यास संबंधित रेस्टॉरंट मालक, हॉटेलमालकांवरही नियमाप्रमाणे कारवाई.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : पुण्यात एका पोलिसांचा कोरोनाविरुद्ध लढताना मृत्यू

News Desk

…तोपर्यंत मुंबई अनलॉक करणं घातक, पालकमंत्र्यांचं वक्तव्य

News Desk

पुण्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६३.९० टक्क्यांवर

News Desk