HW News Marathi
महाराष्ट्र

३१ डिसेंबरला तब्बल ४५५ तळीरामांवर पोलिसांची कडक कारवाई

मुंबई | जगभरात नववर्षाच्या जल्लोषात स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईतील अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस आनंदा घालवण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण आनंदी उत्सुक असतात. यावेळी सर्रास मद्य प्राशन करण्यात येते. त्यामुळे नागरिकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविले जातात. यात ३१ डिसेंबर २०१८ ते १ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांनी मुंबईतील मद्य प्राशन करून वाहने चालवणाऱ्या ४५५ चालकांवर कारवाई केली. तर वाहन वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या १ हजार ११४ चालकांवर दंडात्मक कारवाई केली.

पोलिसांची ४५५ तळीरामांवर कारवाई

मुंबई पोलिसांनी जवळपास ४५५ वाहन चालकांवर सोमवारी (३१ डिसेंबर) रात्री वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. यात ओव्हर स्पीड आणि रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या १ हजार ११४ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर वाहतुकीचे इतर नियम मोडणाऱ्या ९ हजार १२१ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई पोलिसांनी देखील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात सोमवारच्या रात्री मोठी मोहिम राबवली असून या मोहिमे अंतर्गत मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या ३५३ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा तळीरामांच्या संख्येत वाढ

तसेच मुंबई, नवी मुंबईप्रमाणे सांगली देखील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सांगलीत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २२४ वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली, या मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या ९२ जणांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर ५० पेक्षा जास्त वाहने जप्त करण्यात आली. या महाराष्ट्र कारवाई एकूण ६८ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सांगलीत वाहन चालवताना मोबाईल वापरणाऱ्या १२ जणांवर, ट्रिपलसीट वाहन चालवणाऱ्या ३६, फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या २ आणि ड्रिंक अँड ड्राइव्हप्रकरणी ९२ जणांवर कारवाई करण्यात आली. तर गत वर्षी ६१५ लोकांच्या विरोधात मद्य प्राशन करून वाहन चालवल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला होता. गत वर्षाच्या तुलनेत यंदा वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन जास्त झाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागरीकांना छळण्यासाठी NCB चा वापर होतोय! – जयंत पाटील

News Desk

“मनसे सोबत गेल्यास भाजपचे मोठे नुकसान होईल”, रामदा़स आठवले

News Desk

“…तर जावेद अख्तरना तालिबाननं चौकात फटके मारले असते”, सुधीर मुनगंटीवारांचा जावेद अख्तरांवर हल्ला

News Desk