HW News Marathi
महाराष्ट्र

“तर तो ‘शक्ती’ कायदा, काय चाटायचा आम्ही?”, पूजा आत्महत्या प्रकरणावरुन राणे बंधुनी सरकारला झापले

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता वेगळचं वळण लागलं आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात आल्यापासून भाजप प्रचंड आक्रमक झाली आहे. एरव्ही भाजप सरकारवर आणि शिवसेनेवर टीका करत असतेच. मात्र, आता या प्रकरणात आयतं कोलीत सापडल्यासारखं झालं आहे. तसेच महाविकास आघाडीतील असलेले घटकपक्षही शिवसेनेवर दबाव निर्माण करत आहेत. भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणेंनीही पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणावरुन राणे बंधुंनी शिवसेनेला आणि महाविकासआघाडी सरकारला चांगलेच सुनावले आहे.

तर तो “शक्ती” कायदा, काय चाटायचा आम्ही?- नितेश राणे

नितेश राणेंनी ट्विटमध्ये शक्ती कायद्याचा उल्लेख करत महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. जे दिशा बरोबर झाले. तेच पूजा बरोबर होणार असेल. तर तो “शक्ती” कायदा, काय चाटायचा आम्ही?, असं म्हणत नितेश राणेंनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेवरही जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

गुन्हेगार पर्यटनासाठी मंत्रालय सध्या एक नंबरवर – निलेश राणे

तर दुसरीकडे भाजप नेते निलेश राणेंनीही नेहमीप्रमाणे ठाकरे सरकारवर घणाघात केलाय. पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येमागे ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याची चर्चा आहे. तुरुंग पर्यटन या सरकारने सुरू केलं आहे कुठेतरी वाचण्यात आलं पण जर एकाच इमारतीमध्ये गुन्हेगार पर्यटन सुरू करायचं असेल तर मंत्रालय सध्या एक नंबर वर आहे, असं ट्विट करत त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय नौसेनेत कोरोनाचा शिरकाव, २० नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

7 एप्रिलनंतर शिवसेनेकडून मंत्रिमंडळात फेरबदल ?

News Desk

अजित पवारांना राष्ट्रवादीकडून वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट…

News Desk