HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंची पण ड्रग्स टेस्ट करा… निलेश राणेंचा टोला!

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर आता त्यात राजकीय वळण येताना दिसत आहे. सीबीआय सध्या तपास करत असलेल्या चौकशीत ड्रग्स कनेक्शनही समीर आले आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्स यांचा संबंध पुन्हा समोर आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत हिने ड्रग्सबाबत उघडपणे बोलताना थेट बॉलिवूडच्या ४ कलाकारांची नावे घेतली होती. यात रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांची ब्लड टेस्ट करावी असे म्हटले होतं.

यावरुन कायम सत्ताधारी पक्षावर टीका करणारे भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. केवळ रणवीर अथवा रणबीर कशाला तर आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची चाचणी करावी, कारण बॉलिवूडच्या सर्कलमध्ये आदित्य ठाकरेंचा वावर असतो असे निलेश राणे म्हणाले आहेत.

 

कोणत्याही फिल्मी कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार देण्यापूर्वी त्याची रक्तचाचणी बंधनकारक करा, अशी मागणी यापूर्वी कंगनाने केली होती. बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्ज घेतले जाते. पाण्यासारखे ड्रग्ज वाहते, असे कंगना अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती. काही माझ्या वयाचे युवा वैयक्तिकरित्या ड्रग्ज घेतात आणि शो करतात. या कलाकारांबद्दल ब्लाइंड आयटमदेखील लिहिले गेले होते. डीलर सारखे असतात.

सर्व काही एक प्रकारे हाताळले जाते. त्यांच्या पत्नीदेखील अशा पार्टी आयोजित करतात़ तिथे पूर्णपणे वेगळे वातावरण असते. तिथे असे लोक भेटतात जे फक्त ड्रग्स घेतात आणि दुस-यांसोबत दुर्व्यवहार करतात. काही सरकारांनी या बॉलिवूडच्या ड्रग्ज माफियांना पुढे जाण्यासाठी सहकार्य केले. बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांमध्ये रिलेशन आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यवतमाळमध्ये ११ शेतक-यांचा मृत्यू, काहींना अंधत्व

News Desk

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजू शेट्टींचा ‘आक्रोश मोर्चा’!

Jui Jadhav

LIVE UPDATE : मराठा आरक्षण, जेल भरो आंदोलन

News Desk